न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२०) :- हिंजवडी, वाकड, नाशिक फाटा येथे निवारा बसथांबा राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुरु केल्याबद्दल चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने उपाध्यक्ष सूरज आसदकर यांना चालक व्ही.एस रणदिवे, वाहक ए.एन. नवगिरे, नाशिक फाटा येथील तिकीट वाहक दीपक जायभाई तसेच प्रवासीयांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी निर्मला माने, दादासाहेब माने, रहिमान गवंडी, शरद चव्हाण, मुकेश चुडासमा आदी उपस्थित होते.
प्रवासी संघाच्यावतीने गेल्या अनेकवर्षे हिंजवडी, वाकड, नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन, निगडी येथे प्रवासीयांसाठी निवारा बसथांबा सुरु करण्यात यावा. याबाबत गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. वरील ठिकाणी प्रवासी व तिकीट वाहक यांचे आतोणात हाल होत होते. ज्येष्ठ नागरिक, महिला इतरांना आपल्या इच्छिकस्थळी जाण्यासाठी बसची वाट पाहावी लागत होती. तिकीट वाहकाला व प्रवासीयांनादेखील ऊन-वारा-पाऊसाच्या प्रसंगी अनेक समस्यांचा समोरोजावे लागत होते. तिकीट वाहकाकडे रोख रक्कम असल्यामुळे चोर, लुटारुंपासून असुरक्षित असल्याची भावना रात्रीच्या वेळी जाणवत होती. यापूर्वी छोटीशी केबिनमधूनच प्रवासी विचारपूस करत असे. रात्रीच्यावेळेला केबिनमध्ये विद्युत पुरवठा नसल्यामुळे तिकीट वाहकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे. सध्या नाशिक फाटा येथील एसटी बस थांब्यावर चढउतार करणार्या महिला प्रवासीयांसाठी निसर्ग हॉटेल येथील खाजगी शौचालयाचे वापर करीत असल्याचे अनिल सावंत, गणेश चव्हाण यांनी सांगितले, तसेच चिंचवड स्टेशन येथे थंडी व पावसाच्या वेळेसा ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी शौचालय नसल्यामुळे परिसरातील खाजगी व्यवसायिकाला, रिक्षा चालकांना येथे सार्वजनिक शौचायल कोठे आहे, अशी विचारणा प्रवासीयांसाठी होत असते.
वाकड येथून दादर, बोरिवली, ठाणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, कर्नाटकापर्यंत लालपरी, एशियाड बस, शिवशाही बसमधून प्रवासी प्रवास करत असे, तसेच नाशिक फाटा येथून पुणे ते नाशिक, शिर्डी, कोपरगाव, मनमाड, धुळे, नंदुरबार, कल्याण (आळेफाटा मार्गे) सूरत, पेठ, बडोदा आदी ठिकाणी पिंपरी चिंचवड येथील प्रवासी प्रवास करतात. एसटी महामंडळाने भव्य सतरा प्रवासी बसू शकतील एवढी आसन व्यवस्था तसेच तिकीट वाहकासाठी स्वतंत्र, टेबल-खुर्चीसाठी जागा उपलब्ध असल्यामुळे प्रवासी व तिकीट वाहक समाधान व्यक्त करीत आहे. ज्येष्ठ नागरिक, वयस्कर महिला, गरोदर स्त्रिया आदींना बसण्याची सोय उपलब्ध झाली असली तरी, तेथे वीजपुरवठा नसल्यामुळे रात्रीच्यावेळेला असुरक्षितता जाणवत आहे. तसेच वरील निवारा एसटी बस थांब्यालगत स्त्री व पुरुषांसाठी शौचालयाची नितांत आवश्यकता भासत आहे.
सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. सध्या सकाळी ६ ते २ तसेच २ ते १० यादरम्यान तिकीट वाहकाची नेमणूक करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेला अनेक एकट्या महिला प्रवासी इतर प्रवासी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या बसथांब्यावर ये-जा करीत असतात. मात्र, त्यांच्या सुरक्षितेतेसाठी परिवहन विभागाच्या वतीने अद्याप कोणतीच सुविधा करण्यात आली नाही. त्यांच्या सुरक्षितेसाठी परिवहन महामंडळाचे तिसर्या पाळीत देखील तिकीट वाहकाची नेमणूक करण्यात यावी, तसेच पोलिस विभागाच्या वतीने सर्व थांब्यावरती रात्रीच्यावेळी प्रवासीयांच्या सुरक्षितेतेसाठी पोलिस कर्मचार्याची नेमणूक करण्यात यावी, पिंपरी चिंचवड मधील वरील सर्व बसथांब्याच्या ठिकाणी चिंचवड प्रवासी संघाच्या घेतलेल्या माहितीप्रमाणे भुयारी गटार असून तेथे सार्वजनिक शौचालय स्त्री व पुरुषांसाठी बांधावा व प्रवासीयांची गैरसोय करावी. या मागण्यांचा पाठपुरावा आता चिंचवड प्रवासी संघ, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पिंपरी-चिंचवड महापालिका, भोसरी, पिंपरी, चिंचवड येथील आमदार, खासदार आदींना पत्रव्यवहार करून प्रवासीयांची मागणी पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.