- आज गुरुवारी ७८४ जणांना कोरोनाची बाधा तर, ३० जणांचा मृत्य; १२६२ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) रोजी ७८४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२६२ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे थेरगाव (स्त्री ५९ वर्षे), कासारवाडी (पुरुष ७५ वर्षे), मोशी (पुरुष ६० वर्षे), पिंपळे सौदागर (पुरुष ६० वर्षे), पिंपरी (पुरुष ४५ वर्षे), निगडी प्राधिकरण (पुरुष ५४ वर्षे, पुरुष ६६ वर्षे), चिंचवड (पुरुष ६५ वर्षे), भोसरी (पुरुष ६३ वर्षे, पुरुष ५० वर्षे), काळेवाडी (स्त्री ६५ वर्षे, स्त्री ६० वर्षे, पुरुष ७० वर्षे), च-होली (पुरुष ७१ वर्षे), दिघी (पुरुष ६८ वर्षे), पिंपळे गुरव (स्त्री ६० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेला रुग्ण हे वडगांव शेरी (स्त्री ५१ वर्षे), हडपसर (पुरुष ६४ वर्षे), धनकवडी (स्त्री ४५ वर्षे), विठ्ठलवाडी (पुरुष ४५ वर्षे), जुन्नर (पुरुष ७० वर्षे, पुरुष ४८ वर्षे), वारजे ( स्त्री), पाषाण (स्त्री ६५ वर्षे), खेडशिवापूर (पुरुष ५४ वर्षे), करमाळा (पुरुष ८४ वर्षे), देहूरोड (पुरुष ५२ वर्षे), आळंदी (पुरुष ३४ वर्षे), खंडाळा (पुरुष ३७ वर्षे), देहूगांव (पुरुष ६६ वर्षे) येथील रहिवासी आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७३२६० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६३८१४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १२०६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.