- आज शनिवारी ११५१ जणांना कोरोनाची बाधा तर, ६५ जणांचा मृत्य; १२५० जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) रोजी ११५१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२५० जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे निगडी (पुरुष ८१ वर्षे, पुरुष ७० वर्षे), काळेवाडी (पुरुष ५७ वर्षे, स्त्री वर्षे,पुरुष ५७ वर्षे, पुरुष ६२ वर्षे, स्त्री ४२ वर्षे), चिंचवड (पुरुष १२ वर्षे, पुरुष ६९ वर्षे, पुरुष ७०वर्षे, स्त्री ५५वर्षे, पुरुष ६६ वर्षे, पुरुष ४४ वर्षे), पिंपरी (पुरुष ५५ वर्षे, पुरुष ५४ वर्षे, पुरुष ७३ वर्षे), दिघी (स्त्री ५५ वर्षे), कासारवाडी (स्त्री ६८ वर्षे, पुरुष ६० वर्षे, पुरुष ७६ वर्षे), चिखली (पुरुष ५३ वर्षे, स्त्री ७५ वर्षे), पिंपळेगुरव (पुरुष ३० वर्षे, स्त्री ६५ वर्षे, पुरुष ७३ वर्षे), भोसरी (स्त्री ७०वर्षे), मोशी (पुरुष ६२ वर्षे, पुरुष ७५ वर्षे), आकुर्डी(पुरुष ६७ वर्षे), सांगवी (पुरुष ६२ वर्षे, पुरुष ६४ वर्षे, पुरुष ४३ वर्षे), नेहरुनगर(पुरुष ६४ वर्षे), च-होली (स्त्री ६७ वर्षे), रावेत (पुरुष ६३ वर्षे), संततुकाराम नगर, पिंपरी (पुरुष ७३ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे जुन्नर (पुरुष ७० वर्षे, पुरुष ७० वर्षे), धायरी (पुरुष ४७ वर्षे), चाकण (पुरुष ७५ वर्षे), धनकवडी (पुरुष ३२ वर्षे), वडगांव शेरी (पुरुष ६२ वर्षे), हडपसर (पुरुष ५५ वर्षे), आंबेगांव (स्त्री ५० वर्षे, पुरुष ८० वर्षे, पुरुष ३५ वर्षे), देहूरोड (पुरुष ४१ वर्षे), शिवने (स्त्री ६८ वर्षे, पुरुष ७१ वर्षे), पाषण(पुरुष ६० वर्षे, स्त्री ६१ वर्षे), येरवडा (स्त्री ७० वर्षे), ऊंड्री (स्त्री ५८ वर्षे, पुरुष ५१), पुणे (पुरुष ५२ वर्षे, पुरुष वर्षे, स्त्री ७० वर्षे), धानोरी (स्त्री ७० वर्षे), बोपोडी (स्त्री ६५ वर्षे), बिबवेवाडी (पुरुष ४४ वर्षे), वाघोली (पुरुष ५८ वर्षे), उमरज (पुरुष ६६ वर्षे), डोंगरगाव (पुरुष ८० वर्षे), माळवाडी (पुरुष वर्षे), लोणी (पुरुष वर्षे) येथील रहिवासी आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील कळविलेल्या ३६ मृत रुग्णांपैकी २४ तासांमध्ये ११ रुग्णांचा मृत्यु झालेले आहेत आणि यापुर्वी मृत झालेले परंतु आज अहवाल प्राप्त झालेले मृत्यु २५ आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७५२६७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६६३८२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १२६५ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.