- आता सातऐवजी रात्री दहा वाजेपर्यंत मिळणार हॉटेलमधून पार्सल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- कोरोना काळात अडचणीत आलेल्या हॉटेल व्यवसायाला पार्सल सुविधेमुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी वेळेच्या बंधनामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे संध्याकाळी सातऐवजी रात्री उशिरापर्यंत वेळ वाढवून देण्याची पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनची मागणी पुणे महापालिका आयुक्तांनी मान्य केली असून रात्री दहा वाजेपर्यंत आता हॉटेलमधून पार्सल देता येणार आहे.
दिवसभरात नागरिकांची पार्सलासाठी एवढी मागणी नसते. परंतु, संध्याकाळी ही मागणी वाढते. परंतु, नियमानुसार संध्याकाळी सात वाजता हॉटेल बंद करावे लागते. अन्यथा पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे वेळ वाढवून मिळावी याकरिता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून आयुक्तांनी वेळ वाढवून देण्यास दिल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले.















