न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- प्रहार अपंग क्रांती यांच्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सदस्य सहभागी झाले होते. अपंगांच्या विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले.
सकाळी अकराच्या सुमारास महापालिका भवनासमोर आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी अपंग धारकांना स्टॉल संरक्षण मिळायला हवे असे विविध फलक हातात घेतले होते.
‘भारत माता की जय.. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही’, अशा प्रकारच्या घोषणा अपंग कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे आदी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.















