न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त त्यांच्या दापोडी येथील पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसदस्या स्वाती ऊर्फ माई काटे , माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.















