न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) रोजी ५५४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ९५९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे काळभोरनगर (पुरुष ६५ वर्षे), निगडी (पुरुष ५६ वर्षे, पुरुष ७२ वर्षे), चिखली (पुरुष ५३ वर्षे,पुरुष वर्षे), सांगवी (पुरुष ६५ वर्षे), चिंचवड (स्त्री वर्षे), वाकड (स्त्री २९ वर्षे), पुनावळे (पुरुष ८५ वर्षे), वाल्हेकरवाडी (पुरुष ७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे देहूगांव (स्त्री वर्षे), मुळशी (स्त्री ५५ वर्षे),आंबेगांव (स्त्री ६५ वर्षे), लोणावळा (पुरुष वर्षे), चाकण (पुरुष वर्षे) येथील रहिवासी आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७६६३३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६८२५५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १२९० जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.















