न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहर कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व वस्ताद पोपटराव सदाशिवराव फुगे (वय ६५) यांचे हृदयविकाराने सोमवारी निधन झाले. नगरसेविका भीमाबाई फुगे यांचे ते पती होत.
फुगे यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. भोसरी पंचक्रोशीत ‘ वस्ताद ‘ म्हणून ते परिचित होत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांच्या आरोग्यात सुधारणा देखील झाली होती. परंतु, तत्पूर्वीच सोमवारी (ता. २८) सकाळी त्यांचे रुग्णालयातच हदयविकाराने निधन झाले.















