न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसें.) :- यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील गरीब व गरजू रूग्णांना मोफत जेवण पुरविण्याऱ्या ‘रियल लाईफ रियल पिपल्स’ या संस्थेला आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज एक संगणक प्रदान केला.
या संस्थेतर्फे वायसीएममधील गरीब व गरजू रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दररोज मोफत जेवण पुरविले जाते. संस्थेच्या या सामाजिक कार्याची नोंद घेऊन आमदार निधीमधून आज त्यांना संगणक देण्यात आला. यावेळी सुमेध चाबुकस्वार, शिवसेनेचे युवा सेनेचे उपशहरप्रमुख अभिजीत गोफण वैद्यकीय अधिकारी मनोज देशमुख, सहाय्यक उप वैद्यकीय अधिकारी एस. एन. जाधव, संस्थेचे प्रमुख एम. ए. हुसेन, विजय जगताप आदी उपस्थित होते.















