न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगर येथील माध्यमिक शाळेत आय टीच या संस्थेच्या वतीने आठवी ते दहावीची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यास पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजुरी दिली.
या संस्थेने पुणे महापालिकेत ६ शाळा सुरू केल्या असून, त्याच धर्तीवर पिंपरी – चिंचवड महापालिका हा उपक्रम राबवित आहे. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच, इतर सर्व खर्च संस्था करणार आहे. त्यासाठी देणगीदारांची मदत घेतली जाणार आहे.
महापालिका वर्ग खोल्या उपलब्ध करून देण्याबरोबरच वीज व पाणीपुरवठा करणार आहे. यासंदर्भात संस्थेने पालिकेकडे २३ जानेवारीला प्रस्ताव दिला होता. या शाळेत केवळ पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशप्रक्रिया लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. प्रत्येक वर्गात विद्यार्थी संख्या ३५ असणार आहे.


















