न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने महापालिकेचे ४० पैकी ५ कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
त्यात डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, चाकण – म्हाळुगे येथील म्हाडा, इंदिरा महाविद्यालय, चिंचवडमधील रुग्णालय आणि किवळे येथील सिम्बायोसिस महाविद्यालय येथील सेंटर बंद करण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सेंटरमध्ये बाधित रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण घटल्याने अनेक बाधित घरी राहून उपचार घेणे पसंत करीत आहेत. सेंटरमध्ये रुग्णसंख्या घटल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यावर चर्चा केली. त्यात अनावश्यक सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात इतर सेंटर बंद केले जाणार आहेत, असे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी बुधवारी (दि. ३०) सांगितले.


















