न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- वाढदिवसाच्या दिवशी घरात कार्यक्रमाची तयारी सुरु असतानाच गॅलरीतून पडून एक वर्षाच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात ही घटना घडली असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अद्विका धरतेज गाथाडे (वय १) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. अद्विका गॅलरीमध्ये खेळत असताना ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. अद्विका गॅलरीमध्ये खेळत होती. तर तिचे बाबा बाथरूमला गेले होते आणि आई सोसायटीतील लोकांना वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेली होती. याचवेळी अद्विका गॅलरीमधून खाली पडली.















