न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२०) :- भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याची नवनिर्वाचित कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. भाजप शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या शुभहस्ते किशोर हातागळे यांची कामगार आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
किशोर हातागळे यांनी या अगोदर बांधकाम कामगारांसाठी हजारो असंघटित कामगारांना विविध शासकीय योजनेचा लाभ देत कामगार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, याचबरोबर निगडी भाजप अध्यक्ष ही जबाबदारीही त्यांनी पार पाडली असुन शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला होता.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजप महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य एकनाथ पवार, नगरसेवक तथा भाजप कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस केशव घोळवे, भाजप प्रदेश सरचिटणीस प्रिती व्हिक्टर, कामगार नेते हनुमंत लांडगे तसेच भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष प्रकाश मुगडे हे उपस्थित होते.


















