- रविवारी ५४४ जणांना कोरोनाची बाधा तर, २० जणांचा मृत्यु; ६९१ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज रविवारी (दि. ०४ ऑक्टोबर) रोजी ५४४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महापालिका हद्दीतील १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण च-होली (४० वर्ष), चिंचवड (६२ वर्ष, ३१ वर्ष), पिंपळे गुरव (३६ वर्ष, ६० वर्ष, ६१ वर्ष), पिंपरी (७० वर्ष), पिंपळे निलख (७२ वर्ष), रावेत (६६ वर्ष), चिखली (७५ वर्ष) दापोडी (६२ वर्ष), पिंपळे सौदागर (५७ वर्ष), निगडी (८९ वर्ष) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले ७ हे रुग्ण सहकारनगर (७८ वर्ष), जुन्नर (६३ वर्ष), खडकवासला (५७ वर्ष), आबेगाव (७७ वर्ष), भोर (६२ वर्ष), जुन्नर (४८ वर्ष), विश्रांतवाडी (५२ वर्ष) येथील रहिवासी आहेत.
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांद्वारे २१३१२५६ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये १८५४ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ४३४ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८०४८० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७३६७१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १३६१ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.















