- सोमवारी ४४३ जणांना कोरोनाची बाधा तर, १८ जणांचा मृत्यु; ८३३ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ०५ ऑक्टोबर) रोजी ४४३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महापालिका हद्दीतील १० परुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण काळेवाडी (७० वर्षे, ४७ वर्षे), चिखली (६० वर्षे, ६९ वर्षे), खराळवाडी (७२ वर्षे) किवळे (६५ वर्षे), चिंचवड (६४ वर्षे, ५३ वर्षे), थेरगांब (८९ वर्षे), कासारवाडी (५९ वर्षे) तसेच ०३ स्त्री – काळेवाडी (३९ वर्षे), आकुर्डी (६८ वर्षे), संत तूकारामनगर (८० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले ०४ पुरुष हे रुग्ण पुरंदर (५७ वर्ष), धावडी (६९ वर्ष), पुणे ( ९१ वर्ष), हिवरे (५८ वर्ष), ०१ स्त्री – खेड (३९ वर्ष) येथील रहिवासी आहेत.
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांद्वारे २१८१९३२ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये १९६३ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ४४४ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८०९२३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७४५०४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १३७४ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















