न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जलउपसा केंद्र, रावेत येथील पंपगृहांमधील २२ के.व्ही. उच्चदाब वीज संच मांडणीचे अचानक उद्भवलेले उपस्कर वाहिनीचे तातडीचे दुरूस्ती काम करणेकामी मंगळवारी (दि. ०६) रोजी स. ११ ते १२.३० या कालावधीमध्ये जलउपसा बंद राहणार आहे.
त्यामुळे आज मंगळवार (दि. ०६) रोजी रात्रीचा तसेच दूस-या दिवशी बुधवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होणार आहे, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी व उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा व जल निःसारण विभागाचे सह शहर अभियंता यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


















