न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (देि. ०६ ऑक्टोबर २०२०) :- पर्यटन बंदीचा आदेश मोडून रविवारी पहाटे पवन मावळातील तिकोणा गडावरील दरवाजा तोडून पर्यटक गडावर गेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे दुर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोनामुळे किल्ले तिकोणा गडावरील दरवाजा बंद करण्यात आला होता. तसेच पवनमावळसह मावळ तालुक्यात पुणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटन बंदीचा आदेश लागू केला असताना रविवारी पर्यटकांनी हा आदेश झुगारून किल्यावर दरवाजा तोडून प्रवेश केला. काही पर्यटकांनी रविवारी पहाटेच्या सुमारास तिकोणा गडावरील बाल किल्ल्याच्या दरवाज्याची मोडतोड करुन गडावर गेले.
दोन वर्षांपूर्वी श्रमदानातून गडावर दरवाजा बसविण्यात आला होता. गडावरील दरवाज्या तोडण्याची ही दुसरी घटना असल्यामुळे दुर्गप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. शिवप्रेमींसह दुर्गप्रेमींकडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बजंरग दल व सह्याद्री प्रतिष्ठाणच्यावतीने लोणावळा ग्रामीणचे उपनिरिक्षक निरंजन रनवरे यांना निवेदन देण्यात आले आहे.


















