न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (देि. ०६ ऑक्टोबर २०२०) :- कागदाच्या नोटांबाबात करण्यात आलेल्या एका शोधानुसार एका नोटेवर हजारो बॅक्टेरिया असतात, जे माणसाच्या हातातून त्याच्या शरिरात जाऊन आरोग्याबाबत अडथळे निर्माण करतात. याच आधारावर असा अंदाज बांधण्यात येत आहे की, कोरोना व्हायरस देखील कागदाच्या नोटांमार्फत पसरू शकतो. यामुळे आरबीआयने एक गाइडलाइन जारी केली आहे. कॅश आणि नोटांच्या व्यवहारासंदर्भातील ही गाइडलाइन आहे.
पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींपैकी एकाला खोकला झाला असेल, तर तो खोकताना किंवा शिंकताना हाताचा वापर करतो. तेच हात तो पैसे देताना देखील वापरणार, अशा वेळी संक्रमण अधिक जलद वेगाने होण्याची शक्यता असते. परिणामी अशाप्रकारचे व्यवहार टाळण्याचे आरबीआयने सूचवले आहे.
अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (CAIT) सरकारकडे असा प्रस्ताव ठेवला आहे की, सरकारने सद्य परिस्थिती पाहता सिंथेटिक पॉलिमरपासून बनणाऱ्या नोटा चलनात आणण्याचा विचार करावा. ज्यामधून कोरोना संक्रमणाचा धोका कागदी नोटांपेक्षा कमी आहे. अधिकाधिक प्रमाणात डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करण्याची सूचना आरबीआयकडून देण्यात आली आहे.


















