- पालिकेच्या ६६ जागा लढविणार; स्थानिक-बाहेरवाला ५०+५० टक्के फॉर्म्युला ठरला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२०) :- पुढील पंधरा महिण्यानंतर म्हणजे फेब्रुवारी २०२२ ला होणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ६६ जागा मराठी एकीकरण विकास आघाडी ही पुर्ण ताकदीनिशी लढणार आहे. या निवडणुकी वेळी शहरातील स्थानिक भुमिपुत्र व महाराष्ट्रातील भुमिपुत्र असा पन्नास पन्नास टक्के उमेदवारीचे सुत्र असणार आहे. आणि हे सुत्रच पुढील महानगरपालिकेची सत्ता कुणाची हे ठरवीणार असल्याचे मराठी एकीकरण विकास आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे यांनी सांगितले आहे.
सध्या शहरात बाहेर गावाहून आलेल्या मतदारांची संख्या ही ७५ टक्के एवढी आहे. महानगर पालिकेत मात्र त्यांना त्या पटीत प्रतिनिधीत्व मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक अडचणी येतात. अशा वेळी काही स्थानिक मंडळी बाहेर गावाहून आलेल्या वर्गाला योग्य पध्दतीने न्याय देत साथ सोबत देतात. अशा लोकांना बरोबर घेऊन मराठी एकीकरकण समिती शहरातील भोसरी, पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील भुमिपुत्रांचे प्राबल्य आहे, अशा ठिकाणी आपले उमेदवार उभे करुन येणाऱ्या पालिकेत शुध्द मराठी संस्कृतीचा, मराठी मनाचा, मराठी अस्मितेचा, मराठी बाणेचा, मराठी शौर्याचा, भुपुत्रांच्या भविष्याचा वेध घेणारी सत्ता स्थापन करणार आहे.
सध्या शहरात मराठवाडयातून आलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. त्यानंतर परप्रांतिय, पश्चिम महाराष्ट्र व त्यामध्ये देखील सोलापुर, भागातील मतदारांची संख्या अधिक प्रमाणात आहे आणि त्याच पध्दतीने त्यांचे मागसलेपण देखील. नेमके हीच संख्या लक्षात घेऊन व स्थानिक जे आताप्रर्यंत राजकारणात वंचित राहिलेली मंडळी आहे. अशा घटकाला घेऊन मराठी एकीकरण विकास आघाडी ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरी जाणार आहे. तसा प्रस्ताव देखील पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक भुमिपुत्रांनी मांडला असून त्याला मराठी एकीकरण विकास आघाडीने स्विकारले आहे, असे छाया सोळंके-जगदाळे यांनी सांगितले आहे.
निवडणुकीत थेरगाव, काळेवाडी व भोसरी मतदारसंघावर प्रभाव
पिंपरी चिंचवड शहरात सर्वात जास्त मराठवाड्याहून आलेल्या वर्गाची संख्या मोठी आहे. पण या वर्गाने आपली एकजूट न दाखवल्यामुळे राजकारणात त्यांना आपला प्रभाव दाखवता आला नाही. पण वरील सुत्राप्रमाणे जर मराठी एकीकरण विकास आघाडीने स्थानिक व बाहेरवाल्यांची एकत्रीत मोठ बांधल्यास ही आघाडी थेरगाव, काळेवाडी, पिंपरी मतदारसंघातील काही भाग व भोसरी मतदारसंघात सर्वात जास्त आपला करिश्मा दाखवू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे. असे घडल्यास याचा फटका भाजप या पक्षाला बसेलकी महाविकास आघाडीला बसेल हे आत्ताच सांगता येत नसले तरी ही आघाडी त्यांच्या संख्येच्या प्रमाणात निश्चितपणे चमत्कार दाखवू शकते यात शंका नाही.
महापालिकेला खाजगी प्रॉपटी समजणाऱ्या विरोधातली आघाडी
सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे आपलीच खाजगी प्रॉपटी आहे हा समज अनेक वर्षापासून सुरु आहे. मागील वेळी प्रथमच सत्ता परिवर्तन झाले पण विचारात मात्र परिवर्तन झाले नाही. त्यामुळे महानगरपालिकेकडे पाहण्याचा नवीन सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोनही तोच जुनाच राहिला आहे. हाच दृष्टीकोन बदलण्यासाठी शहरातील वंचित भुमिपुत्र व महाराष्ट्रातील भुमिपुत्रांना बरोबर घेऊन मराठी एकीकरण विकास आघाडी ही महानगरपालिकेची पुढील निवडणुक लढविण्याची तयारी करत आहे. सध्या शहरातील विकास हा फक्त बिल्डर घटकापुरताच मर्यादीत असून तेथे सामान्य लोकांना, अतिसामान्य घटकाला कोणतेच स्थान नाही. यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचार बोकाळला आहे. शहरातील जनतेच्या पैशाची अक्षरशा कायद्यात बसून लुट केली जात आहे. या सर्वाना महापालिकेतील अधिकारी देखील तेवढेच जबाबदार आहेत. शहरात उच्चभ्रु लोकांचा परिसर सोडल्यास इतर ठिकाणी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ वाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हेच आमच्या शक्तिचे केंन्द्र बिंदू असणार आहेत. यातुनच आम्ही इतिहास घडविणार असून यासाठी आम्ही उमेदवारीचे पन्नास, पन्नास टक्के सुत्रांचा अवलंब केला आहे व तो कमालीचा यशस्वी होईल याचा आम्हांला ठाम विश्वास आहे.


















