- अशोक बँकेचे संस्थापक, माजी भूमी अभिलेख अधीक्षक अशोक शिलवंत यांच निधन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२०) :-पिंपरी, संत तुकारामनगर येथील अशोक बँकेचे संस्थापक, माजी भूमी अभिलेख अधीक्षक अशोक शिलवंत यांचे हृदयविकाराच्या धक्याने आज (शुक्रवारी) सकाळी निधन झाले. त्यांचे वय ५९ होते.
पिंपरी कॅम्पातील भूमी अभिलेख कार्यालयात ते अधीक्षक म्हणून कार्यरत होते. वर्षभरापूर्वी अशोक शिलवंत सेवानिवृत्त झाले होते. धम्म चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते होते. संत तुकारामनगर येथे अशोक नागरी सहकारी बँकेची त्यांनी संस्थापना केली होती. समाजातील गरजूंना मदतीसाठी ते नेहमी तप्तर असत. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
सकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराच्या धक्का बसला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा धर असा परिवार आहे.


















