न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जुनी सांगवी येथील माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी भाजी मंडईचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसदस्य संतोष कांबळे, नगरसदस्या शारदा सोनवणे, उपायुक्त संदीप खोत, कार्यकारी अभियंता अनिल राऊत, उप अभियंता विजय भोसले, सुरक्षा अधिकारी केशव वाबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, गाळाधारक आणि नागरिक उपस्थित होते. या मंडईमध्ये ७६ गाळे आहेत.