न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२०) :- कोरोनाच्या संकटामुळे भोसरीतील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे (आप्पा) यांनी आपला वाढदिवस कुटुंबियांसोबत साधेपणाने साजरा केला.
कोणताही डामडौल न करता भोसरीतील टागोर शाळेच्या काही मोजक्या व गरीब परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या दत्तक घेउन त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्या मुलांचा वर्षभराचा शाळेचा खर्च ते स्वखर्चातून करणार आहेत.
“मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे इतरांना मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत,” असं आवाहन त्यांनी आपले मित्र, आप्तेष्ठ व सहकाऱ्यांना केले होते.