न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन पिंपरी विधानसभेतील प्रभाग क्र. १५ निगडी प्राधिकरण येथील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. नगरसेवक सचिन चिखले यांनी सर्व तरुणांचे पक्षांमध्ये स्वागत केेले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्र भर ताकद वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय तळमळीने काम करत आहे. शहरातील पाणी प्रश्न, कोरोना काळात वैद्यकीय खरेदीतील भ्रष्टाचार अशा अनेक प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवत आहे.
त्यामुळे राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन निगडी येथील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला आहे, अशी माहिती नगरसेवक सचिन चिखले यांनी दिली आहे.


















