न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून त्याचा राग मनात धरून अल्पवयीन भावाने धुडगूस घालत इतर पाच मित्रांच्या मदतीने कोयत्याने दहा रिक्षा आणि दोन दुचाकी अशा एकूण १२ वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.
चिंचवडच्या वेताळनगर परिसरात मध्यरात्री ही घटना घडली. सकाळी हा प्रकार उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या बहिणीने मंगळवारी आळंदीमध्ये पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्यानंतर ते घरी आले. याचा राग मनात धरून रात्री ११ च्या सुमारास त्याने इतर पाच मित्रांच्या साथीने वेताळनगर परिसर आणि राहत असलेल्या इमारतीच्या जवळील १० रिक्षाच्या काचा कोयत्याने फोडल्या. तसंच इतर दोन दुचाकींचं नुकसान केलं आहे. चिंचवड पोलिसांनी तातडीने दोघांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध घेत आहेत.


















