न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- सार्वजनिक स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी गेलेल्या व्यक्तीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना पिंपरी येथे घडली. तसेच पाच दुचाकी चोरीला गेल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे.
अजय सुभान मुन्शी (वय ३९, रा. आंबेडकर नगर, लांडेवाडी टेल्को रस्ता, भोसरी) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहात रात्री साडेनऊ वाजता लघुशंकेसाठी गेले होते. चावी गाडीलाच असल्याचा फायदा घेत चोरट्याने गाडी पळवून नेली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. राहत्या घरापासून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद सागर महादेव गराडे (वय २४, रा. सप्तश्री अपार्टमेंट, बालाजीनगर, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे.
चिंचवडमधील टेल्को कंपनी समोरून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नवनाथ दत्तू खाडे (वय ३५, रा. प्राधिकरण निगडी) यांनी दिली आहे. मुंबई महामार्गावरील एसबीआय बँक समोरून दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद विश्वनाथ बाळासाहेब जाधव (वय ३१, इंद्रायणीनगर, गाथा मंदिर, देहूगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दिली. लक्ष्मण शिवाजी चव्हाण (वय ३५, बुचडेनगर, मारुंजी) यांनी घराजवळून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली आहे.


















