- पालिका आयुक्तांकडून शहरवासियांना वाघोली प्रकल्पाचे गाजर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने दिवसाआड पाणीपुरवठा आणखी वर्षभर केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या वाघोली प्रकल्पातील जलशुद्धीकरण अतिरिक्त ४० ते ५० एमएलडी पाणी उपलब्ध झाल्यानंतर दिवसाआड पुरवठा बंद करून तो नियमितपणे एकवेळ केला जाईल, असा दावा महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि.२७) केला.
वाढत्या लोकसंख्येच्या शहराला समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा आहे. जोरदार पावसामुळे शहराची तहान भागविणारे पवना धरण १०० टक्के भरले आहे. असे असताना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे. दिवसाआड पाणीपुरवठा बंद तो नियमितपणे सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
त्याबाबत विचारले असता, आयुक्त म्हणाले की, संपूर्ण शहराला एकाच वेळी पाणीपुरवठा करताना मोठ्या साठ्याची गरज भासते. त्यासाठी अतिरिक्त ४० ते ५० एमएलडी पाण्याची गरज आहे. पुणे महापालिकेच्या वाघोली प्रकल्पातून ४० ते ५० एमएलडी इतके पाणी शहरासाठी उपलब्ध होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेस किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वर्षभर दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहिल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.


















