न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२०) :- एकाच दिवशी चार पोलीस ठाण्यातील १२ सराईतांना तडीपार करण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झिरो टॉलरन्स ही मोहीम राबवली आहे. त्याअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्याचे प्रस्ताव पाठवण्याबाबत परिमंडळ दोनमधील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी परिमंडळ दोनचा पदभार स्वीकारला. त्यांनी सराईतांना हद्दपार करण्याचा सपाटा लावला आहे.
हिंजवडी , वाकड , देहरोड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यातील सुधाकर शिवाजी लिमकर (रा. पुनावळे), तुषार महादु बावकर (रा. मुळशी पुणे) तर वाकड पोलीस ठाण्यातील इरफान जमशेर खान (रा. थेरगांव, पुणे), स्वप्निल उर्फ भोन्या प्रकाश घाडगे (म्हातोबानगर, वाकड), सुनिल विश्वनाथ ठाकुर (रा. रहाटणी), दिपक बाळू धोत्रे (रा. निगडी) यांना तडीपार केले.
तसेच देहरोड पोलीस ठाण्यातील समीर अकबर शेख (रा. थेरगांव), शुभम उर्फ राजू राजेद्र तरस (रा. किवळे), अमीर समीर शेख (रा. गांधीनगर, देहरोड) सत्वील चित्रा स्वामी (रा. देहुरोड), कमल बाबु हिरेमठकर (रा, देहुरोड), तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील सदानंद अरुण चव्हाण (रा. परंदवडी, मावळ) यालाही तडीपार करण्यात आले आहे.











