न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) :- पुणे विभागात ऑक्सिजनचा वापर निम्म्यापेक्षा अधिक घटला आहे. एक महिन्यापूर्वी ऑक्सिजनचा वापर पुणे विभागात प्रतिदिन ३७२ मेट्रिक टन होता; तो आता तब्बल ५६ टक्के, म्हणजे २१० मेट्रिक टन इतका कमी झाला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन (एफडीए) ने दिली.
पुणे विभागात द्रव स्वरूपात ऑक्सिजनची निर्मिती करणारे तीन ऑक्सिजन उत्पादक प्लँट आहेत. त्यापैकी पुण्यात दोन आणि कोल्हापुरात एक आहे. त्याच्याकडून सध्या दररोज २७३ मेट्रिक टन द्रव स्वरूपातील ऑक्सिजनचे उत्पादन होते. त्यापैकी निम्मा द्रव स्वरूपातील ऑक्सिजन थेट मोठया रुग्णालयांना देण्यात येतो. पुण्यात १७, सातारा ४, सांगली २, सोलापुर आणि कोल्हापुरात ४ असे आहेत.












