न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) :- रहाटणी येथील सितारा गार्डन चौकातील चिंतामणी डेअरी येथे सुरु असलेल्या एका मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्यामध्ये पोलिसांनी जुगाराचे साहित्य जप्त करत सहा जणांना अटक केली.
चंद्रकांत नंदकुमार सुरवसे (वय ३८), उमेश भाऊराव गाडगे (वय ३७), उमेश गहिनीनाथ ठाकर (वय ३१), अंकुश नाटंबे (सर्व रा. रहाटणी), निलू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), दिनेश बलदानी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलीस शिपाई टी. आर. शिंदे यांनी गुरुवारी (दि. २९) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रहाटणी येथील सितारा गार्डन चौकातील चिंतामणी डेअरी येथील मटका अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी (दि. २८) छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक केली.












