- पालिकेच्या गलथान कारभारावर स्थानिक नगरसेविकेकडून संताप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) :- शहरातील विस्कळीत आणि कमी दाबाने होत असलेला पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या सर्व गोष्टींना महापालिका प्रशासनाचा गलथान कारभारच जबाबदार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी चिखली, जाधववाडी प्रभागाच्या नगरसेविका अश्विनी जाधव यांनी निवेदनाद्वारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यावर्षी चांगला पाऊस पडलेला आहे. धरण शंभर टक्के भरलेले आहे. मात्र महापालिका हद्दीतील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी आहे. त्यामुळे प्रशासनाने मुबलक पाणीपुरवठा अशी मागणी होत आहे.
जाधववाडी परिसरात कमीदाबाने व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. तर बहतांश सोसायट्यांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुहे नागरिकांना खासगी टँकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने एक दिवस आड पाणी पुरवठ्याची घोषणा मागे घेऊन दररोज पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेविका जाधव यांनी केली आहे.












