न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. नोव्हेंबर २०२०) :- आरोपी रविवारी सायंकाळी दारु पिऊन घरी आला. त्यावेळी घरगुती कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपीने पाण्याने भरलेला हंडा तानाजी यांच्या डोक्यात घातला. शेजाऱ्यांनी तानाजी यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना रविवारी (दि. १) रात्री आठच्या सुमारास वेताळनगर, चिंचवड येथे घडली. तानाजी सदबा सोलंकर (वय ५५, रा. मोरया हाऊसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर, संजय तानाजी सोलंकर (वय ३०) असे संशयित मुलाचे नाव आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.


















