- माजी नगरसेवक व त्याच्या साथीदाराला पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. नोव्हेंबर २०२०) :- भागीदारीत जागा विकसित करण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाची ४५ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल २००८ ते ३० ऑक्टोबर २०२० या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.
भाजपच्या विद्यमान नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती असलेल्या माजी नगरसेवकाला व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. राजूरामा लोखंडे (वय ५०), प्रकाश रामा लोखंडे (वय ४८, दोघे रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत लक्ष्मण शिवाजी चव्हाण (वय ५६, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजू लोखंडे हे माजी नगरसेवक असून त्यांच्या पत्नी महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आहेत. फिर्यादी चव्हाण हे बांधकाम व्यावसायिक आहेत. विलास महादू काशीद यांची जागा आम्ही घेतो, आपण ५०-५० टक्के भागीदारीने ती जागा विकसित करू असे म्हणून आरोपी यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला होता.