- शिवसेना तिरोडा विधानसभेचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसें ) :- पुणे जिल्हा हा भारताच्या इतिहासातील शौर्याचा साक्षिदार आहे. प्रामुख्याने छञपती संभाजी महाराजांचा इतिहास देखील याच जिल्ह्यातील वढु गावातील संभाजी महाराजांच्या बलिदानाचा साक्षिदार आहे. तसेच छञपती संभाजी महाराजांना देखील पिंपरी चिंचवड शहरामधून नेऊन वढु या ठिकाणी अखेरचे बलीदान दिल्याची इतिहासात नोंद आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पिंपरी रेल्वे स्थानकाचे ‘छत्रपती संभाजी महाराज रेल्वे स्थानक’ असे नामकरण करावे, अशी मागणी शिवसेना तिरोडा विधानसभेचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे रेल्वे स्थानकास नाव दिल्याने, समाजातील नविन पिढीला आदर्श मिळेल व त्यांच्या इतिहासाचे संवर्धन होईल. याकरीता रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर तसा प्रस्ताव तयार करावा. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पिंपरी रेल्वे स्थानकाचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ नामकरणास हिरवा कंदील दाखवण्याची मागणी दाखले यांनी केली आहे.












