न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसें ) :- रयत विद्यार्थी विचार मंच (महाराष्ट्र राज्य) मावळच्या वतीने विश्वरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साई, या ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
यावेळी रयत विद्यार्थी विचार मंचाचे मावळ तालुका प्रमुख अतुल वाघमारे, रोजगार निर्माण परिषद मावळ तालुका अध्यक्ष अजय यादव, शिक्षण समिती सदस्य साई, विलास यादव, मेहुल ननवरे, समिर यादव, किरण पिंगळे, निखिल यादव, सुरेश पिंगळे आदी उपस्थीत होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही प्रसंग रयत विद्यार्थी विचार मंचचे मावळ तालुका प्रमुख अतुल वाघमारे यांनी सांगीतले.












