- वाहतूक सेनेत कार्य करण्यास इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा – सचिन चिखले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२०) :- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची पिंपरी-चिंचवड शहर (पुणे) विधानसभेतील संपूर्ण पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या आदेशाने बरखास्त करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी पत्रकाद्वारे आदेश दिला आहे.
येत्या काही दिवसात नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे. वाहतूक सेनेमध्ये कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्या इच्छुकांनी पक्ष कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केले आहे