न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) :- दिवाळीनिमित्त बाजारात फराळ तसेच मिठाईची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. या काळात मिठाईची रेलचेल असते. दरम्यान, मिठाईचालकांना तो पदार्थ बनविल्याची तारीख आणि खाण्यायोग्य तारीख नमूद करण्याची सक्ती करण्यात आली आता आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून ( एफडीए ) या निर्णयाची अंमलबजावणी होते आहे का नाही, याची तपासणी केली जात आहे. एफडीएने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १३५ खाद्यान्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. तर ८७९ मिठाई संशयावरून जप्त केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्या दुकानांवर रीतसर कारवाई करण्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मिठाईसाठी आवश्यक असलेला खवाही एफडीएने जप्त केला आहे.
मिठाई आकर्षक दिसावी, यासाठी भरमसाठ खाद्यरंग मिसळण्याचे प्रकार घडत आहेत. मिठाईवर लावण्यात येणारा चांदीचा दर्जा, मिठाईत वापरण्यात येणारा खाद्यरंगही तपासला जाणार आहे. गुजरातहून येणारी बर्फी व इतर परराज्यातील मिठाईवर एफडीएचा वाच असणार आहे.