न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी व देहूरोड मार्गावर उभारण्यात आलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी डिसेंबर महिन्यात खुला केला जाणार आहे, असे महापालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सोमवारी (दि. २३) सांगितले.
पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील निगडीच्या भक्ती – शक्ती समूह शिल्प चौकात उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर व वर्तुळाकार मार्गाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. या मार्गामुळे वाहनचालकांना सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये – जा करावी लागत आहे. या प्रकल्पातील निगडी ते देहूरोड मार्गावरील सुमारे १ किलोमीटर अंतराच्या उमणपुलाचे काम पूर्ण झाल्याने तेथून वाहतूक सुरू करावी. वाहनचालक व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. त्यासाठी रास्ता रोको व आंदोलनही केले जात आहेत.
या संदर्भात सवणे यांना विचारले असता ते बोलत होते. ते म्हणाले की, उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, काही कामे अद्यापि शिल्लक आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने उझणपूल सुरक्षित असल्याचे वाहतूक पोलिसांकडून पाहणी केल्यानंतर अंतिम तपासणी अहवाल अद्यापि प्राप्त झालेला नाही. तसेच, पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात केवळ उड्डाणपुलावरून दोन्ही बाजूचे रस्ते वाहतुकीस खुले करण्याचे नियोजन आहे.