- बँक ठेवीदारांच्या अपेक्षा वाढल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- आर्थिक अडचणीतील रूपी को ऑपरेटिव्ह बँकेचा विलीनीकरणाचा फेरप्रस्ताव राज्य सहकारी बँकेने सोमवारी (दि. २३) सहकार आयुक्तालयास सादर केला आहे. याबाबत बँकेच्या विलीनीकरणाबाबतची शिफारस सहकार आयुक्तालय विस्तृतपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डकडे लवकरच पाठविणार असल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे रक्कम अडकून पडलेल्या बँकामधील ठेवीदार, खातेदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. सहकार आयुक्तालयात पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राज्य बँकेत रुपी व सिटी बँकेच्या विलीनीकरणाबाबतचा प्रस्ताव सहकार आयुक्तालयाकडून सादर झाल्यानंतर आरबीआयने संयुक्त बैठक घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये नाबार्डच्या अधिकाऱ्यांसह सहकार आयुक्तालय, राज्य बँक, रुपी बँक, सिटी बँक आणि ठेवीदारांच्या प्रतिनिधींसह संयुक्त चर्चा करावी. त्यामध्ये अडचणींवर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला पाहिजे.
– विद्याधर अनास्कर, प्रशासक, राज्य सहकारी बँक, मुंबई.