न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर मधुकरराव पवळे यांच्या पुण्यतिथी निमित्त महानगर पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उपायुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
त्यानंतर निगडी येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळयासही उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.


















