न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२०) :- मानवी साखळी तयार करून केंद्र सरकारने कामगार व शेतकरी कायद्यात केलेल्या बदलाचा झेडे, फ्लेक्स, बॅनर घेऊन तसेच घोषणा देऊन गुरुवारी (दि. २६) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध व्यक्त केला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू असलेल्या संचारबंदी आणि जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले.
कामगार नेते इरफान सय्यद, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संजीवन कांबळे, संदीप भेगडे, केशव घोळवे, किशोर ढोकळे, दिलीप पवार, अनिल माधवराव रोहम, अजित अभ्यंकर यांच्यासह अनेक कार्यकत्यांवर भारतीय दंड विधान कलम १८८,२६९ महाराष्ट्र पोलीस कायदा, साथीचे रोग अधिनियम, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम, महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस शिपाई मीनाक्षी प्रभू राळे यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.