- माजी आमदार विलास लांडेंच्या कॉलेजवर आ. महेश लांडगेंनी बजावला मतदानाचा हक्क !
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२०) :- पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत शहरातील आमदार आणि खासदारांमध्ये एकमेव पदवीधर मतदार असलेले आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि माजी आमदार विलास लांडे यांच्याशी संबंधित असलेल्या लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर आमदार लांडगे यांनी मतदानाचा हक्क बाजावत ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’चाही संदेश दिला आहे.
मंगळवारी सकाळी या निवडणुकीसाठी शांततेत मतदानाचा सुरूवात झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १८ ठिकाणी मतदान केंद्र आहेत. सर्वच ठिकाणी भाजपाने मतदान बूथ यंत्रणा सक्षमपणे कार्यरत ठेवली आहे, असे चित्र आहे.