न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ४ डिसेंबर) रोजी १४९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९३०८८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८९५११ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १६५६ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले पाच पुरुष रुग्ण हे पिंपरी (७२,५५ वर्षे), भोसरी (५६ वर्षे), चिखली (८१ वर्षे), चिखली (७० वर्षे) तर, ०२ स्त्रीया या भोसरी (७० वर्षे), चिखली (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले दोन पुरुष रुग्ण हे आंबेगाव (५४ वर्षे), आळंदी (४० वर्षे) येथील रहिवासी आहेत.