न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील औषध व्यावसायिक कोविड-१९ शी अविरतपणे अहोरात्र ग्राहकांना सेवा देऊन समर्थपणे लढा देत आहेत. महापालिकेकडून खासगी वैद्यकीय चिकित्सकांची कोविड-१९ लसीकरणसाठी नाव नोंदणी सुरु आहे.
पलिका प्रशासनाने शहरातील सर्वच औषध विक्रेत्यांची कोविड-१९ लसीकरणसाठीची नाव नोंदणी सुरु करून, औषध विक्रेत्यांना कोविड-१९ ची लस मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष व काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष
विवेक मल्हारी तापकीर यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.