- धोकादायकपणे रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचे होतायेत अपघात..
- पालिकेच्या त्या आठही नगरसेवकांचे आयुक्तांपुढे गाऱ्हाणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. उड्डाणपूल दीड किलोमीटर अंतराचा असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता येत नाही. नागरिक शॉर्टकट म्हणून धोकादायकपणे रस्ता ओलांडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. मागेही याच रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना २ ते ३ लोकांचा अपघात झालेला आहे. यामध्येही काही जण मृत्युमुखी पडलेले आहेत.
निगडी गावठाणमध्ये रस्त्याच्या बाजूला मोठी बाजारपेठ असल्यामुळे व दोन ते तीन शाळा यामध्ये अमृतानंदमयी मठ, विद्यानंद भवन शाळा, महानगरपालिकेची शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे व पालकांची मोठा प्रमाणात ये-जा होत असते.
या ठिकाणी अंडरपास व भुयारी मार्ग करून द्यावा, अशी मागणी पालिकेचे नगरसेवक सचिन चिखले, राजु मिसाळ, शैलजा मोरे, सुमन पवळे, अमित गावडे, शर्मिला बाबर, उत्तम केंदळे, कमल घोलप या आठ नगरसेवकांनी व राजेंद्र काळभोर, शंकर उर्फ आप्पा काळभोर, रोहिदास शिवणेकर, चंद्रकांत बाळा दाणवले, उत्तम ढाणे काका, ओमकार पवळे, पुदित शेमलीनी, उज्वला माळी, नूर खान, नैनाराम या कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.














