न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २९ डिसेंबर) रोजी १२१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री – सांगवी (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ० १ पुरुष – मावळ ( ५५ वर्ष) ०१ स्त्री – खेड (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत. इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २१५ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी १६७ प्रवाशाची चाचणी केली असून त्यापैकी ११२ नकारात्मक असून २ अहवाल कोविड सकारात्मक आहे. उर्वरित ५३ अहवाल प्रलंबित आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९६३१६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३१०७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७५२ जणांचा मृत्यू झालेला आहे.














