न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२०) :- सेवानिवृत्त कर्मचा-यांनी सेवा करीत असताना अनेक घरगुती अडचणींवर मात करत आपली सेवा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यामुळे महानगरपालिकेचा नावलौकिक वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. माहे डिसेंबर २०२० अखेर नियत वयोमानानुसार आणि स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचा सत्कार महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देताना महापौर माई ढोरे यांनी सर्वांना आरोग्याची काळजी घ्यावी आणि सेवानिवृत्तीनंतर आनंद मिळवावा असा सल्ला दिला.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संतोष लोंढे,कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी अविनाश ढमाले,सुप्रिया सुरगुडे, मिलिंद काटे, तुकाराम गायकवाड, तुषार काळभोर, अविनाश तिकोणे, निलेश जाधव, बाळासाहेब मालुसरे, योगेश वंजारी उपस्थित होते.
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-यांमध्ये कार्यालयीन अधिक्षक शंकर गेंगजे, निर्मला बधेपाटील, उपलेखापाल सत्यविजय गवस, बबलू तेलंगी, उपअभियंता माधव सोनावणे, मुख्य लिपिक मीना जोशी, राहूल कांबळे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नंदकिशोर गुरव, सहाय्यक शिक्षक मधुकर वाखारे, आनंद गजरमल, वीजतंत्री श्रावण गोसावी, इले. मोटार पंप ऑपरेटर राजेंद्र जगताप, वाहनचालक अनिल रानवडे, सारंग मुधोळकर, सुनिल ताटकर, मुकादम एकनाथ वाबळे, शिपाई भरत जाधव, रखवालदार वामन वाघमोडे, मजूर बबन बोठे यांचा समावेश आहे. तर स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणा-या कर्मचा-यांमध्ये लेखापाल वृषाली गायकवाड, कार्यालयीन अधिक्षक कुसुम तिटकारे, सब ऑफिसर नामदेव शिंगाडे, मुकादम राहूल सुर्यवंशी, भागवत फडतरे, मधुकर वाजे, वॉर्ड बॉय सुधीर जांभळे, सफाई सेवक अनिल चिंचोलीकर, प्रल्हाद शिंदे, शिपाई लालचंद्र कुरील यांचा समावेश आहे.











