- आज ४ जणांना कोरोनाची बाधा; १२३ रुग्णांना डिस्चार्ज, ४ रुग्णांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. १३ जानेवारी) रोजी १६३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – खराळवाडी (५२ वर्षे), ०१ स्त्री – चिंचवड (५५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री – खेड (६९वर्षे), आर्वी, पुणे (७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९८३४८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५०२३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७८० जणांचा मृत्यू झालेला आहे.