- एक किलोमीटरसाठी १८ रुपये भाडे आकारणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२१) :- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रिक्षा थांब्यावर रिक्षाचा मीटर डाऊन करुन उपक्रमाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी रिक्षातून प्रवास केला. ऑनलाइन पैसेही दिले.
यावेळी अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मंचक इप्पर , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, महाराष्ट्र वाहतूक पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने नागरिकांच्या वाहतूक समस्या जाणून घेण्यासाठी ९५२९६८१०७८ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. त्यावर आता रिक्षा मोटर बाबतच्या तक्रारी देखील करता येणार आहेत. एक किलोमीटरसाठी १८ रुपये, दोन किलोमीटर पंचवीस रुपये, तीन किलोमीटर साठी ३७.७० रुपये, पाच किलोमीटरसाठी ६७ रुपये, १० किलोमीटरसाठी १२३ रुपये भाडे आकरण्यात येणार आहे.


















