न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- पिंपळे सौदागर येथील वै.ह.भ.प. पांडुरंग काटे प्रतिष्ठाण संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा झाला. पी के स्कुलचा माजी विद्यार्थी अथर्व राजाराम किरुळकर व अण्णासाहेब मगर मराठी माध्यमिक विद्यालयाची वैष्णवी कोंडीराम फेगडे या दहावी परीक्षेत वर्गात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर राष्ट्रगीत व झेंडागीत सादर करून शालेय विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक राहुल कोरे यांनी मार्गदर्शन केले. शााळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले शालेय अनुभव सांगितले.
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, पवना बँकेचे संचालक जयनाथ काटे, उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, कॅप्टन प्रमोद नलवडे, कुणाल तावरे, कॅप्टन गायकवाड, संस्थापक जगन्नाथ काटे, संचालक सोमनाथ काटे, रोहन काटे, मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
शासकीय सर्व नियमांचे पालन करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले. कार्तिक गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर सायना शिंदे यांनी आभार मानले.