- वडमुखवाडी परिसरातील ३९ अनधिकृत बांधकामे उद्धवस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- इ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत वडमुखवाडी प्रभाग क्र ३ मोहननगर भागात रेड झोन परिसरातील अनधिकृत बांधकामावर आज मंगळवारी (दि ०९) रोजी महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने मोठी कारवाई केली. या कारवाईत ३९ अनधिकृत बांधकाम उद्धवस्त केले. एकूण क्षेत्रफळ अंदाजे ३९१६७ चौ. फूट बांधकाम पाडण्यात आली आहेत.
अतिरिक्त आयुक्त २ अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सह शहर अभियंता मकरंद निकम यांचे उपस्थितीत तसेच कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांचे नियत्रंणाखाली उपअभियंता हेमंत देसाई, सुर्यकांत मोहिते, सुधीर मोरे तसेच ५ कनिष्ठ अभियंता व एकूण १५ बीट ऑफीसर,
पोलीस विभागामार्फत डी सी पी सुधीर हिरेमठ, पी आय मोहन शिंदे, प्रकाश जाधव, ३ पी एस आय व ४२ पोलीस कर्मचारी तसेच आर सी पी चे २३ कर्मचारी यांचे उपस्थितीत कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी ३ पोकलेन, ५ जेसीबी, २५ मजूर व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
















